20 May 2024 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

HUL Share Price | हिंदुस्तान युनिलिव्हर शेअरवर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या, अल्पावधीत होईल नफा

HUL Share Price

HUL Share Price | हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यासोबत कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 18 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 2,657 कोटी रुपये निव्वळ माफ कमावला आहे. आणि याच तिमाहीत कंपनीने 15,806 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी हिंदुस्तान युनिलिव्हर स्टॉक 0.13 टक्के घसरणीसह 2,491.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेकॉर्ड तारीख
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 18 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. HUL कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्यासाठी 2 नोव्हेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. यावर्षी हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी तिसऱ्यांदा आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करणार आहे.

कंपनीची कामगिरी
मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे शेअर्स 2549 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किमत 3 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे शेअर्स फक्त 2 टक्के वाढले आहेत. समीक्षाधीन तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने 15,806 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 15,253 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचा एकूण खर्च 12,211 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा खर्च 11,965 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HUL Share Price NSE 23 October 2023.

हॅशटॅग्स

HUL Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x