 
						Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 267.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 255.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जीनस पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, जीनस पॉवर कंपनीच्या उपकंपनीला 3121 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. हा शेअर सध्या 1.21% घसरणीसह 256 रुपयांवर ट्रेड करत आहे.
जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, जीनस पॉवर कंपनीच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीला 3121.42 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत 36.27 लाख स्मार्ट प्रीपेड मीटरचा पुरवठा, इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंगसह प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टमची रचना संबंधित काम देण्यात आले आहे. या नवीन ऑर्डरमुळे जीनस पॉवर कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार वाढून 17000 कोटीवर पोहचला आहे.
मागील 6 महिन्यात जीन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनी शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. 24 एप्रिल 2023 रोजी जीनस पॉवर कंपनीचे शेअर्स 88.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 ऑक्टोबर 2023 रोजी जीनस पॉवर कंपनीचे शेअर्स 267.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 198 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात जीनस पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे पैसे 213 टक्के वाढवले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजीजीनस पॉवर स्टॉक 84.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ते आता या कंपनीचे शेअर्स 267.80 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		