10 May 2024 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त
x

Paytm Share Price | तज्ज्ञांनी पेटीएम शेअर्ससाठी पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, शेअर कमाई करून देईल, किती परतावा

Paytm Share Price

Paytm Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये देखील कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम या फिनटेक कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.

पेटीएम स्टॉक सोमवारी 8 टक्के घसरणीसह 922.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज गुरूवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 3.61 टक्के घसरणीसह 883.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्म सीएलएसएने आपल्या पेटीएम स्टॉक वाढीबाबत शक्यता व्यक्त केली आहे. ब्रोकरेज फर्म CLSA ने वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सवर 1200 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. मजबूत सकल व्यापारी मूल्यामुळे विदेशी ब्रोकरेज फर्मने कंपनीच्या EBITDA अंदाजात 12-13 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सीएलएसए फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पेटीएम कंपनीसाठी सकारात्मक बातमी अशी की, मागील तीन तिमाहीत कंपनीच्या कर्ज वाटपात होणारी घट थांबली आहे.

CLSA फर्मच्या अहवालानुसार पेटीएम कंपनीच्या UPI प्लॅटफॉर्मवरील क्रेडिट कार्डाना ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. सीएलएसए फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पेटीएम कंपनीची कर्ज वितरण वाढ कमी होऊन 9 टक्क्यांवर आली आहे. मात्र तज्ञांनी पेटीएम स्टॉक पुन्हा तेजीत येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. फिनटेक फर्म One97 Communications कंपनीचा तोटा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 291.7 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत पेटीएम कंपनीला 571.5 रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीने 1,914 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर या तिमाहीत कंपनीने 32 टक्के वाढीसह 2,518.6 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price NSE 26 October 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x