 
						Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये लोअर सर्किट पाहायला मिळत आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4 डिसेंबर 2009 रोजी 33.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 587 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 10 वर्षांंत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.5 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 5.00 टक्के घसरणीसह 559.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 5 वर्षात रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1195 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 611 टक्के नफा कमावून दिला आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 924 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 147 रुपये होती.
20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 695.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 ऑक्टोबर 2023 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 589.05 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका आठवडाभरात रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.
अरिहंत कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉकबाबत आपल्या अहवालात म्हंटले आहे की, या कंपनीचे शेअर्स 50-दिवसांच्या SMA च्या खाली ट्रेड करत आहेत. पुढील काळात रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. म्हणून तज्ञांनी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 645 रुपये स्टॉप लॉस लावून विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 500 ते 547 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीने 21.4 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. याच तिमाहीत कंपनीने 397.43 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसूल संकलनात 6.97 टक्के घट झाली आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज ही स्मॉल कॅप कंपनी रासायनिक उद्योग क्षेत्रात औद्योगिक वायू निर्मितीचे काम करते. ही कंपनी विशेषतः रेफ्रिजरेटेड गॅस बनवण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		