
Stocks in Focus | सध्या जगभरातील शेअर बाजारातून आर्थिक मंदीच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. इस्राईल आणि हमास युद्धाने महायुद्धाचे रूप धारण केले आहे. त्यामुळे मध्य पूर्व आशिया अस्थिर झाला आहे. आणि जगावर तेलाचे संकट निर्माण झाले आहे.
अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज हाऊसने काही शेअर्स निवडले आहेत. यामध्ये इंडियन बँक, केएनआर कन्स्ट्रक्शन्स, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, श्रीराम फायनान्स, एशियन पेंट्स कंपनीचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील काळात आपल्या गुंतवणूकदारांना 37 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात.
इंडियन बँक :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 460 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.58 टक्के वाढीसह 430.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना किमान 11 टक्के परतावा देईल.
केएनआर कन्स्ट्रक्शन्स :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 315 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के वाढीसह 265.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना किमान 19 टक्के परतावा देईल.
स्टरलाइट टेक्नॉलॉजी :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 185 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.29 टक्के घसरणीसह 136.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना किमान 37 टक्के परतावा देईल.
श्रीराम फायनान्स :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 2145 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 1,901.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना किमान 11 टक्के परतावा देईल.
एशियन पेंट्स :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3505 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.93 टक्के घसरणीसह 2,938 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना किमान 18 टक्के परतावा देईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.