15 December 2024 2:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

YES बँकेची संकटातून सुटका करण्यासाठी SBI'ला हुकूम - पी चिदंबरम

P Chidambaram, Modi Government, SBI Bank, YES Bank Crisis

नवी दिल्ली: आजारी येस बँकेला मदत करण्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निर्णयावर वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शंका उपस्थित केली आहे. येस बँकेची या संकटातून सुटका करण्यासाठी एसबीआयला हुकूम देण्यात आल्याचे माझे मत आहे असे चिदंबरम पत्रकार परिषदेत म्हणाले.

चिदंबरम म्हणाले, “येस बँकेचे लोन बुक २०१४ ते २०१९ च्यादरम्यान पाच पटीने वाढले. २०१४ मार्चमध्ये लोन बुक रक्कम ५५ हजार कोटी रुपये होती, त्यामध्ये मार्च २०१९ मध्ये वाढ होऊन २ लाख कोटीहून अधिक झाली. फक्त दोन वर्षांत ९८ हजार कोटींची वाढ होऊन २ लाख कोटींपेक्षा जास्त झाली.

पुढे ते म्हणाले की, “ज्याप्रमाणे एलआयसी स्वेच्छेने आयडीबीआय बँकेची सुटका करण्यासाठी तयार नव्हती, तसेच एसबीआय सुद्धा येस बँकेच्या सुटकेसाठी स्वेच्छेने तयार आहे असे मला वाटत नाही. एसबीआयला तसे निर्देश देण्यात आले आहेत” असे चिदंबरम म्हणाले. आर्थिक संस्थांमध्ये भाजपा सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.

दरम्यान, YES बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आता भारतीय स्टेट बँक पुढे सरसावली आहे. एसबीआयचे चेअरमन रजनिश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एसबीआय YES बँकेत तब्बल २४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं. तसेच, एसबीआय YES बँकेत ४९ टक्के गुंतवणूक करु शकते, असंही त्यांनी सांगितलं.

 

News English Summery: Senior Congress leader and former finance minister P Chidambaram on the State Bank of India’s decision to help the ailing Yes Bank. Chidambaram has raised doubts. Chidambaram told a press conference that SBI has been ordered to relieve Yes Bank from the crisis. Chidambaram said, “Yes Bank’s loan book increased five times between 2014 and 2019. Loan book amount was Rs 55000 crore in March 2014, of which it increased to more than 2 lakh crore in March 2019.

 

Web News Title: Story Modi Government is forcing SBI to make investment in YES bank says former Finance Minister P Chidambaram.

हॅशटॅग्स

#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x