15 December 2024 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Multibagger IPO | या शेअरने 9 दिवसात 40 टक्के परतावा दिला, पुढेही वाढवेल गुंतवणुकीचा पैसा, तुमच्या पोर्टफोलिओत आहे हा स्टॉक?

Multibagger IPO

Multibagger IPO | नुकताच एक नवीन कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती, त्या कंपनीचे नाव आहे, “EP Biocomposites”. ईपी बायो कंपोसिट चा IPO लिस्टींग झाल्यापासून शेअर्स मध्ये पडझड सुरू झाली आहे. ईपी बायो कंपोसिट च्या गुंतवणूकदारांसाठी एक सकारात्मक अपडेट आली आहे, की ह्या स्टॉकमध्ये परकिय गुंतवणूकदारानी आपली गुंतवणूक वाढवली आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार Nav Capital VCC- Nav Capital Emerging Star Fund यांनी ईपी बायो कंपोसिट कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. काल ही बातमी समोर येताच ह्या स्तोकमध्ये अप्पर सर्किट लागला होता.

12000 शेअर्सची खरेदी :
BSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार, 21 सप्टेंबर 2022 रोजी Nav Capital VCC- Nav Capital Emerging म्युच्युअल फंड ने ईपी बायो कंपोसिट कंपनीचे 12,000 शेअर्स विकत घेतले आहेत. ही खरेदी 224.15 रुपये प्रति शेअर या किमतीवर झाली आहे. म्हणजेच Nav Capital VCC कंपनीने यासाठी 26,89,800 रुपये खर्च केले आहेत.

सध्याची ट्रेडिंग प्राईस :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ईपी बायोकंपोसिट शेअरची ओपनिंग 229 रुपये वर झाली होती. दिवसा अखेर कंपनीचे शेअर 236.55 रुपये प्रती शेअर किमतीवर ट्रेड करत होते, जी कंपनीची सर्वकालीन उच्चांक किंमत आहे. ईपी बायोकंपोसिट ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 39 कोटी रुपये आहे. 13 सप्टेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती, तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये सकारात्मक वाढ होताना दिसली आहे.

IPO इश्यू किंमत आणि आताचा परतावा :
ईपी बायोकंपोसिटचा IPO यावर्षी ऑगस्ट 2022 मध्ये खुला करण्यात आला होता. IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 126 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. IPO ओपन झाल्यावर कंपनीचे शेअर्स 27 टक्के प्रीमियमसह 160.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. IPO प्राइस बँडच्या तुलनेत सध्या ईपी बायोकंपोसिट कंपनीचे शेअर्स 90 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत. अर्थात या IPO मध्ये पैसे लावणारे भागधारक जबरदस्त नफा कमावत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger IPO of EP composites has touched all time high price on stock market on 23 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x