21 May 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट Avanti Feeds Share Price | 1 रुपयाच्या शेअरने करोडपती बनवलं, मालामाल करणारा शेअर खरेदी करा Reliance Power Share Price | 26 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर खिसा पैशाने भरतोय, स्टॉकची जोरदार खरेदी IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर तेजीत आला, स्टॉक मधील तेजी टिकुन राहील का? शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक 4 टक्के वाढीसह 389.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. मागील सात दिवसांमध्ये अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 66.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. अदानी पॉवर कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नऊ पट अधिक वाढीसह 6,594 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी पॉवर स्टॉक 3.24 टक्के वाढीसह 385.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

अदानी पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “अदानी पॉवर कंपनीचा एकात्मिक निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 848 टक्क्यांच्या वाढीसह 6,594 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षी 2022-23 जुलै-सप्टेंबर तिमाहीत, अदानी पॉवर कंपनीने 696 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीच्या करपूर्व उत्पन्नात सुधारणा झाल्याने आणि उत्पन्न तसेच कर आघाडीवर सवलत या सर्व सकारात्मक बाबीने कंपनीला मजबूत नफा नोंदवण्यास मदत केली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 61 टक्क्यांच्या वाढीसह 12,155 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 7,534 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. अदानी पॉवर कंपनीच्या उत्पन्नात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, भरतात वीजेची मागणी वाढली आहे, आणि कंपनीचे सेल्स देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

अदानी पॉवर कंपनीची स्थापित थर्मल पॉवर क्षमता 15,210 मेगावॅट आहे. अदानी पॉवर कंपनीचे वीज निर्मिती प्रकल्प गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड राज्यात स्थित आहे.

12 सप्टेंबर 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 409.70 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 22 ऑगस्ट 2022 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 432.50 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचले. मागील पाच वर्षांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 669.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात अदानी पॉवर स्टॉकची किंमत 50 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE 04 November 2023.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x