27 May 2024 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 27 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 27 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
x

ESAF Small Finance Bank IPO | होय! दिवाळी धमाका होणार! 57 रुपयाचा शेअर पहिल्याच दिवशी 33 टक्के परतावा देईल

ESAF Small Finance Bank IPO

ESAF Small Finance Bank IPO | ESAF स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. ओपनिंगच्या तिसऱ्या दिवशी ESAF स्मॉल फायनान्स बँक IPO 73.02 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. ESAF स्मॉल फायनान्स बँकेचा IPO शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2023 दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता.

ESAF स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 57 रुपये ते 60 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. ESAF स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या IPO मध्ये एका लॉटमध्ये 250 इक्विटी शेअर्स ठेवले आहे.

ESAF स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 16.73 पट अधिक सबस्क्राईब करण्यात आला आहे. तर NII चा राखीव कोटा 84.32 पट अधिक सबस्क्राईब करण्यात आला होता. पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 173.52 पट अधिक सबस्क्राईब करण्यात आला होता. तर बँकेच्या कर्मचाऱ्याच्या राखीव कोटा 430 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

ESAF स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO मध्ये 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के, आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के राखीव ठेवण्यात आले होते. बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 5 रुपये सूट दिली होती.

ESAF स्मॉल फायनान्स बँकेचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते मंगळवारी ESAF स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 19 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच ESAF स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 80 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. ही किंमत IPO प्राइस बँडच्या तुलनेत 33.33 टक्के अधिक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ESAF Small Finance Bank IPO Today 08 November 2023.

हॅशटॅग्स

ESAF Small Finance Bank IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x