13 December 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE
x

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअरने 3 वर्षांत 825% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत, तज्ज्ञांनी 6-9 महिन्यांसाठी गुंतवणूक सल्ला

Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही महिन्यांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सरकारकडून या कंपनीला हजारो कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 300 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 1.00 टक्के घसरणीसह 765.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. Zen Tech Share Price

झेन टेक्नॉलॉजी ही कंपनी मुख्यतः ड्रोनविरोधी यंत्रणा बनवण्याचे काम करते. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने पुढील 6-9 महिने कालावधीसाठी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी भारतीय सैन्यासाठी प्रशिक्षण सिम्युलेटर सेवा प्रदान करण्याचे काम करते. याशिवाय कंपनी ड्रोनविरोधी यंत्रणा देखील तयार करते.

ब्रोकरेज फर्मने झेन टेक्नॉलॉजी स्टॉकवर 710-730 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. सध्या झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 765 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 6 टक्क्यांनी कमजोर झाला होता. जर हा शेअर आणखी घसरला तर तज्ञांनी 639-653 रुपये किंमत श्रेणीवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुल रनमध्ये हा स्टॉक अल्पावधीत 854 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर पहिली टार्गेट किंमत 441 रुपये आणि दुसरे टार्गेट किंमत 475 रुपये निश्चित केली होती. 17 ऑगस्ट 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 912 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. मागील दीड महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 15-16 टक्के सुधारणा पाहायला मिळाली आहे.

मागील तीन महिन्यांत झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 85 टक्के मजबूत झाला आहे. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 315 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के आणि मागील तीन वर्षांत 825 टक्के परतावा कमावून दिला आहे.

26 सप्टेंबर 2023 पर्यंत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या ऑर्डर बुकचे मूल्य 1467 कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षात कंपनीला 200-300 कोटी रुपयेच्या नवीन ऑर्डर्स मिळण्याची अपेक्षा आहे. मार्च 2023 पर्यंत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या ऑर्डर बुकचे मूल्य 473 कोटी रुपये होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Technologies Share Price 02 October 2023.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x