14 May 2024 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Servotech Share Price | पॉवरफुल मल्टिबॅगर शेअर! सर्वोटक पॉवर सिस्टम्स शेअरने 9 महिन्यात दिला 350% परतावा, खरेदीला स्वस्त

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या वर्षी सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मॉरिशस स्थित एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड कंपनीने सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के घसरणीसह 76.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड कंपनीने सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीचे 15 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. या कंपनीने ही गुंतवणूक 82 रुपये प्रति शेअर किमतीवर केली आहे. एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड कंपनीने सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीमध्ये 12.30 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीनंतर सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीमध्ये एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड कंपनीने एकूण 0.67 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

10 नोव्हेंबर 2023 रोजी सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले होते की, सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीने EV व्यवसायात पदार्पण करण्यासाठी सर्वोटक ईव्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली आहे. आता ही कंपनी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगच्या व्यवसायात देखील उतरणार आहे.

सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीने देशभरात एकूण 5000 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 76.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE 14 November 2023.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x