12 December 2024 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

आधीच भाजीपाला घेऊन ठेवा | APMC मधील पाचही बाजारपेठा ८ तारखेला बंद राहणार

APMC Market, Support farmers Bharat Bandh, 8 December Bharat Bandh

मुंबई, ६ डिसेंबर: मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केल्यानंतर आता देश आणि जगभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. विविध राज्यातील शेतकरी संघटनांनी मोदी सरकारला या मुद्द्यावरून इशारा देत 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे (Farmers’ unions in the state have warned the Modi government on the issue and declared a nationwide shutdown on December 8). या बंदला आता महाराष्ट्रातून देखील मोठा दिला जात असल्याचं चित्र आहे. भारत बंदला एपीएमसीने पाठिंबा दिला आहे. देशातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, टीआरएस, आप, आणि शिवसेनेने देखील जाहीर पाठिंबा दिल्याने मोदी सरकारच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबई आणि आसपासच्या शहरांसाठी फळे आणि भाजीपाला पुरवठ्यासाठी महत्त्वाचं मार्केट असणाऱ्या एपीएमसीने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांवर होणार आहे. एपीएमसी मधील पाचही बाजारपेठा बंद राहणार (All the five markets in APMC will remain closed) आहेत. याबाबत माथाडी नेते शशिकांत शिंदे (Mathadi leader Shashikant Shinde) यांनी घोषणा केली आहे. व्यापारी, माथाडी, वाहतूकदार, वारनार आदी सर्व घटकांनी भारत बंदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. भाजीपाला, फळ, कांदा, बटाटा, अन्नधान्य, मसाला मार्केट बंद राहणार आहे (Market for vegetables, fruits, onions, potatoes, food grains and spices will be closed during Bharat Bandh).

दरम्यान, बळीराजाला साथ देण्यासाठी व शेतकरी ,व्यापारी व मार्केट कमिट्यांचे अस्तित्व आणि जीवन संपविणाऱ्या या तीन काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी मगंळवार 8 डिसेंबर 2020 रोजी संपूर्ण भारत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपले फळ, भाजीपाला व कांदा बटाटा मार्केट मधील सर्व व्यवहार या दिवशी बंद रहाणार असून आपण सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होऊन नव्या कायद्याचा निषेध करायचा आहे,’ असं आवाहन एपीएमसीमधील संघटनांनी केलं आहे.

 

News English Summary: In support of the farmers, APMC, an important market for the supply of fruits and vegetables to Mumbai and surrounding cities, has decided to join the bandh, which will have a direct impact on the citizens of the city. All the five markets in APMC will remain closed. Mathadi leader Shashikant Shinde has announced this. Traders, Mathadis, transporters, Warnars, etc. have all expressed their support for the Bharat Bandh. Market for vegetables, fruits, onions, potatoes, food grains and spices will be closed.

News English Title: Including APMC all 5 markets will be closed in support of farmers Bharat Bandh called on 8 December news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x