13 May 2024 12:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक चार्ट पॅटर्नने चिंता वाढवली, शेअर किती घसरणार? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! स्टॉक प्राईस सुद्धा स्वस्त, खरेदीला ऑनलाईन गर्दी Kuber Yog 2024 | कुबेर योग 'या' 4 राशींच्या लोकांसांठी भाग्यशाली, यामध्ये तुमची नशीबवान राशी आहे का? Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Union Bank Share Price | पैसा कुठे वाढतोय? या सरकारी बँकेच्या शेअरने 250% परतावा दिला, ग्राहकांची मजबूत कमाई

Union Bank Share Price

Union Bank Share Price | युनियन बँक ऑफ इंडियाने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. त्यामुळे गुरुवारी हा बँकिंग स्टॉक 1 टक्के वाढीसह 144.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमतपातळी 145.25 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 60.32 रुपये होती. युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 140 टक्के मजबूत झाले आहेत.

मागील एका वर्षात युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 82 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 1.65 टक्के घसरणीसह 140.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

युनियन बँक ऑफ इंडिया ही डिसेंबर 2023 तिमाहीत जबरदस्त कामगिरी करणारी सरकारी बँक ठरली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सने सातत्याने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या बँकिंग शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे. युनियन बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेचे एकूण बाजार भांडवल 1,06,294.51 कोटी रुपये आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाचा एक वर्षाचा बीटा 0.7 आहे. जो या तिमाही कालावधीतील कमी अस्थिरता दर्शवत आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 74.4 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्या ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसाच्या सरासरी किमतीवर ट्रेड करत आहेत.

डिसेंबर 2023 तिमाहीतील कमाईनंतर मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरची टार्गेट प्राईस 165 रुपये निश्चित केली आहे. आनंद राठी फर्मने या बँकिंग शेअर्सची टार्गेट प्राईस 166 रुपये निश्चित केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत युनियन बँक ऑफ इंडियाने 60 टक्के वाढीसह 3,590 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत युनियन बँक ऑफ इंडियाचा निव्वळ नफा 2,249 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

युनियन बँक ऑफ इंडियाने डिसेंबर 2023 तिमाहीत 29,137 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने 24,154 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न 25,363 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचे उत्पन्न 20,883 कोटी रुपये नोंदवले गेले होते. 31 डिसेंबर 2023 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया बँकेचे NPA गुणोत्तर 4.83 टक्क्यांवर आले होते.

मागील वर्षी याच तिमाहीत बँकेचा NPA 7.93 टक्के नोंदवला गेला होता. या तिमाहीत युनियन बँक ऑफ इंडियाचा निव्वळ NPA घसरून 1.08 टक्क्यांवर आला आहे. तर डिसेंबर 2022 मधे बँकेचा निव्वळ NPA 2.14 टक्के नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Union Bank Share Price NSE Live 27 January 2024.

हॅशटॅग्स

Union Bank Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x