
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO ची किंमत बँड जाहीर केली आहे. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर 2023 पासून गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 475 ते 500 रुपये दरम्यान जाहीर केली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची किंमत बँड ही ग्रे मार्केट मधील शेअरच्या किमतीच्या तुलनेत 47.4 टक्के अधिक आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 30 शेअर्स ठेवले आहेत. गुंतवणूकदारांना किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 15,000 रुपये जमा करावे लागणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 24 नोव्हेंबर 2023 रोजी बंद होईल.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, गुरुवारी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 298 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर पुढील काही दिवसांत टाटा टेक्नॉलॉजी जीएमपीमध्ये बदल झाला नाही तर, या कंपनीचे शेअर्स 800 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. अशाप्रकारे टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या गुंतवणुकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 60 टक्के नफा मिळू शकतो.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1 डिसेंबर 2023 रोजी शेअर्स वाटप करेल. आणि या कंपनीचे शेअर्स 4 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जाऊ शकतात. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने IPO मध्ये कर्मचाऱ्यांसाठी 2 लाख 3 हजार शेअर्स राखीव ठेवले आहेत. जुलै ते सप्टेंबर 2023 तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या निव्वळ नफ्यात 36 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 351.09 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर वार्षिक आधारावर कंपनीचा महसूल 33.8 टक्क्यांच्या वाढीसह 2526.70 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.