2 May 2025 4:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स शेअर्सची तेजी थांबणार? 'या' बातमीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली

JP Associates Share Price

JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनी आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात एक लोन सेटलमेंट करार झाला होता. जा करारामुळे अनेक बँकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीला कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी आयसीआयसीआय बँकेला पत्र लिहून हा करार मागे घेण्याची मागणी केली आहे.

या करारानुसार जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड ही कंपनी आपले 7.71 टक्के भागभांडवल आयसीआयसीआय बँकेला थकित कर्जाची परतफेड करण्यासाठी देत आहे. या शेअरचे एकूण मूल्य 366 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 6.40 टक्के घसरणीसह 19.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

जय प्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनीवर भारतातील 32 बँकांचे 29,272 कोटी रुपये कर्ज आहे. RBI ने 2017 साली जयप्रकाश असोसिएट्स कंपनीला दिवाळखोरी प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. आयसीआयसीआय बँकेने कर्जाची वसुली करण्यासाठी केलेला करार सर्व कर्जदात्या बँकांना आश्चर्यचकित करणारा आहे. कारण सर्व बँका या कंपनीकडून कर्ज वसूल करण्यासाठी धडपडत आहेत. तांत्रिकदृष्ट्या आयसीआयसीआय बँकेला आरबीआयने देखील जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स घेण्याची परवानगी दिली होती.

मागील आठवड्यात जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीवर ऑक्टोबर 2023 पर्यंत 4,258 कोटी रुपये कर्जाची थकबाकी आहे. NCLT ने मंजुरी दिली की, काही स्थिर मालमत्ता हस्तांतरित केल्यावर जयप्रकाश असोसिएट्स कंपनीवरील कर्ज 18,682 कोटी पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

ICICI बँकेने 2018 साली राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या अलाहाबाद खंडपीठासमोर जयप्रकाश असोसिएट्स कंपनीविरुद्ध दिवाळखोरी याचिका दाखल केली होती. ही याचिका NCLT च्या अलाहबाद खंडपीठाने अद्याप स्वीकारली नाही. ICICI बँक 3,000 कोटी रुपये थकबाकी असलेली जयप्रकाश असोसिएट्स कंपनीची सर्वात मोठी कर्जदाती आहे. त्यानंतर IDBI बँकेने जयप्रकाश असोसिएट्स कंपनीला 1,836 कोटी रुपये कर्ज दिले आहे.

ICICI बँकेने जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या इतर कर्जदारांसोबत चर्चा न करता, जयप्रकाश असोसिएट्स कंपनीसोबत कर्ज सेटलमेंट करार केला आहे. जॉइंट लेंडर्स फोरममध्ये देखील अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. त्यामुळे अनेक बँकांनी आत आयसीआयसीआय बँकेला इतर कर्जदात्याशी चर्चा न करता हा करार कसा केला? असा सवाल केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Associates Share Price NSE 18 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

JP Associates Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या