12 December 2024 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Pension Rs.7500 Money | पगारदारांनो! आता महिना पेन्शन रु.1450 ऐवजी रु.7500 पेन्शन मिळणार, अपडेट आली

Pension Rs.7500 Money

Pension Rs.7500 Money | कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) समाविष्ट पेन्शनधारकांनी किमान 7500 रुपये मासिक पेन्शन सह इतर मागण्यांसाठी 31 जुलै रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएस-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत म्हणाले की, दीर्घकाळ नियमित पेन्शन फंडात योगदान देऊनही पेन्शनधारकांना इतकी कमी पेन्शन मिळत आहे की त्यांचे जगणे कठीण झाले आहे.

गेल्या आठ वर्षांपासून देशभरातील 78 लाख पेन्शनधारक किमान पेन्शनवाढीची मागणी करत आहेत. परंतु त्यांच्या मागणीची सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही.

पेन्शनर अनेक दिवसांपासून पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी
सध्या पेन्शनधारकांना दरमहा सरासरी 1,450 रुपये पेन्शन मिळत आहे. महागाई भत्ता, दरमहा 7500 रुपये बेसिक पेन्शन, पेन्शनधारकांच्या पत्नीला मोफत आरोग्य सुविधा आदी मागण्या पेन्शनधारकांनी केल्या आहेत. राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री आणि कामगार मंत्र्यांशी दोनदा चर्चा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे पेन्शनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे. पेन्शनची रक्कम वाढवावी, अशी मागणी पेन्शनधारकांकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे.

जंतरमंतरवर 31 जुलै आणि 1 ऑगस्टला धरणे
आता जे राजकीय पक्ष आमच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येतील, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. आमचा लढा सुरूच राहील…” संघर्ष समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 29 आणि 30 जुलै रोजी दिल्लीत होत आहे. यामध्ये पेन्शनधारकांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी जंतरमंतरवर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, त्यात देशभरातील पेन्शनधारक सहभागी होणार आहेत.

पगारातून EPF – 8.33 टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS)
ईपीएस (एम्प्लॉई पेन्शन स्कीम) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के, तर भविष्य निर्वाह निधीत (EPF) 95 टक्के रक्कम जाते. तर नियोक्त्याच्या 12 टक्के वाट्यापैकी 8.33 टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जातो. याशिवाय पेन्शन फंडात सरकारच्या स्वत:च्या योगदानाच्या 1.16 टक्के योगदान दिले जाते. या अंतर्गत मिळणारी पेन्शन महागाईच्या तुलनेत खूपच कमी आहे. पेन्शनधारकांकडून पेन्शनची रक्कम वाढवण्याची मागणी केली जात आहे.

News Title : Pension Rs.7500 Money EPF Updates check details 30 July 2024.

हॅशटॅग्स

#Pension Rs.7500 Money(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x