
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO द्वारे टाटा मोटर्स कंपनी आपले 4.63 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO चा आकार 2314 कोटी रुपये आहे. IPO मधून जमा होणारी रक्कम टाटा टेक्नॉलॉजी कंपनी कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे. गुरुवार दिनांक (23 नोव्हेंबर 2023) रोजी शेअर्स 0.17% वाढून 682.35 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
टाटा मोटर्स कंपनीने आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कर्जमुक्त होण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. 1996 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे कंट्रोलिंग स्टेक खरेदी केले होते. त्यावेळी या कंपनीच्या शेअरची किंमत 7.4 रुपये होती. म्हणजेच त्यावेळी टाटा मोटर्स कंपनीला टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी 34.24 कोटी रुपये खर्च करावे लागले होते. आता हे शेअर्स IPO च्या माध्यमातून विकून टाटा मोटर्स कंपनी 2279.50 कोटी रुपये नफा कमावणार आहे.
मागील महिन्यात टाटा मोटर्स कंपनीने आपल्या प्री-आयपीओ डील अंतर्गत 9.9 टक्के भाग भांडवल विकले होते. या विक्रीतून टाटा मोटर्स कंपनीने 1613.70 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 2023 मध्ये सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्स कंपनीवर 38700 कोटी रुपये कर्ज आहे. आयपीओनंतर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे भाग भांडवल प्रमाण 53.39 टक्क्यांवर येईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.