
SBI Debit Card | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बँकेने आपल्या काही डेबिट कार्डशी संबंधित वार्षिक देखभाल शुल्कात बदल केला आहे. हे बदल पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच १ एप्रिलपासून लागू होतील. या कार्डांच्या मेंटेनन्स चार्जेसमध्ये 75 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा बदल सर्व कार्डसाठी करण्यात आलेला नाही. एसबीआयचे 45 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.
एसबीआयने डेबिट कार्डशी संबंधित इतर शुल्कांबाबतही आपली रूपरेषा तयार केली आहे. डेबिट कार्ड रिप्लेसमेंट, डुप्लिकेट पिन आणि इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन सारख्या सुविधांसाठीही बँकेला पैसे मोजावे लागतात. याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सध्या जाणून घेऊया मेंटेनन्स चार्जेसचे जुने आणि नवे दर.
मेंटेनन्स फीमध्ये किती बदल
लक्षात घ्या की प्रत्येक कार्डच्या मेंटेनन्स चार्जवर स्वतंत्रपणे जीएसटी आकारला जाईल. जर एखाद्या कार्डचा मेंटेनन्स चार्ज 125 रुपये असेल तर त्यात जीएसटी जोडला जाईल. क्लासिक-सिल्व्हर-ग्लोबल-कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डची किंमत पूर्वी 125 रुपये होती, आता ती 200 रुपये होणार आहे. युवा-गोल्ड-कॉम्बो डेबिट कार्ड-माय कार्डसाठी 175 ऐवजी 250 रुपये मोजावे लागतील.
प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी तुम्हाला 250 ऐवजी 325 रुपये मोजावे लागतील. प्राइड-प्लॅटिनम बिझनेस डेबिट कार्डसाठी 350 रुपयांऐवजी 425 रुपये मोजावे लागतील. 1 एप्रिल 2024 पासून काही क्रेडिट कार्डसाठी भाडे भरण्यावरील रिवॉर्ड पॉईंट्स बंद केले जातील.
इतर चार्जेस
डेबिट कार्ड बदलण्यासाठी 300 रुपये आणि जीएसटी भरावा लागतो. डुप्लिकेट पिन किंवा पिन जनरेट करण्यासाठी 50 रुपये प्लस जीएसटी भरावा लागतो. आंतरराष्ट्रीय व्यवहारांसारख्या सेवांवरही शुल्क आकारले जाते. आंतरराष्ट्रीय व्यवहारात बॅलन्स तपासण्यासाठी 25 रुपये लागतात. एटीएममधून पैसे काढण्यासाठी किमान 100 रुपये आणि 3.5 रुपये जीएसटी आकारला जातो. पॉईंट ऑफ सेल (पीओएस) किंवा ई-कॉमर्स सेवेचा वापर केल्यास जीएसटीसह 3% व्यवहाराची रक्कम आकारली जाईल. या सर्व व्यवहारांवर 18 टक्के दराने जीएसटी आकारण्यात येणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.