8 May 2024 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअरची ब्रेकआऊट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक मजबूत तेजीत येणार

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | मागील काही महिन्यांपासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने आपले 1,023 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीची उपकंपनी कालाई पॉवर आणि रिलायन्स क्लीनजेन यांनी आरसीएफएलकडून घेतलेले 1,023 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे. त्यामुळे रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.89 टक्के वाढीसह 28.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

रिलायन्स पॉवर कंपनीने नुकताच महाराष्ट्रात स्थित असलेला 45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प JSW रिन्युएबल एनर्जी कंपनीला 132 कोटीं रुपये मूल्यावर विकण्याचा निर्णय घेतला आहे. या विक्रीतून मिळालेले पैसे कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत कर्जमुक्त होण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. मागील तीन महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीने डीबीएस बँक, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक या तीन बँकांचे कर्ज परतफेड केले आहे.

मागील आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनपासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स सतत तेजीत वाढत आहेत. बुधवार दिनांक 27 मार्च रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्याच्या वाढीसह 28.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सलग आठ ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 20.40 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. याकाळात शेअर्सची किंमत 35 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना रिलायन्स पॉवर स्टॉक खरेदी करताना 22 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 30 रुपयेच्या पार गेला तर शेअर 34 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर 33.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. कर्ज परतफेडीच्या सकारात्मक बातमीमुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 28 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x