
NECC Share Price | एनईसीसी म्हणजेच नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्क्यांच्या वाढीसह 32.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.14 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 306 कोटी रुपये आहे.
मागील 5 दिवसात नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 60 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. गुरुवारी हा शेअर 1.40% वाढून 32.65 रुपयांवर ट्रेड करत आहे.
नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 62 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यांत नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 160 टक्के वाढले आहेत. 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.42 रुपये या नीचांक किमतीवरून वाढून 32 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनी आपल्या ग्राहकांना माल वाहतूक सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी संपूर्णपणे ट्रक लोड विभागात व्यवसाय करते. यासह, NECC कंपनी आपल्या ग्राहकांना गोदाम आणि पॅकेजिंग सेवा देखील प्रदान करते.
27 मार्च 2020 रोजी नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 3.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमती वरून हा स्टॉक 900 टक्के वाढला आहे. नॉर्थ ईस्टर्न केरिंग कॉर्पोरेशन ही कंपनी भारतात ट्रान्सपोर्ट व्यवसायात अग्रणी कंपनी मानली जाते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीने 83.85 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी या तिमाहीत कंपनीने 1.51 कोटी रुपये PBT नोंदवला होता, जो या तिमाहीत वाढून 2 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.