17 May 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Apollo Micro Systems Share Price | पैसा गुणाकारात वाढवतोय हा शेअर! मागील 1 महिन्यात दिला 103 टक्के परतावा, फायदा घ्या

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाच टक्क्यांच्या वाढीसह 138.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3640 कोटी रुपये आहे. सध्या हा शेअर 3.71% घसरून 133.50 रुपयांवर ट्रेड करत आहे.

अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 161.70 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 23.25 रुपये होती. अपोलो मायक्रो सिस्टम्स या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 103 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी 68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून अपोलो मायक्रो सिस्टम्स स्टॉक 104 टक्क्यांच्या वाढीसह 138.65 रुपये किमतीवर पोहचला आहे. मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 33 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

या किमतीवरून अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 310 टक्के नफा कमावला आहे. मागील एका वर्षात अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 470 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीची स्थापना करुणाकर रेड्डी यांनी 1985 साली केली होती. अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीने सुरुवातीला ISRO साठी डिझाइन संबंधित काम करायला सुरुवात केली होती. आता अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी मुख्यतः रेल्वे, ऑटोमोटिव्ह आणि होमलँड सिक्युरिटी मार्केट संबंधित उपाय सेवा प्रदान करण्याचे काम करते.

या कंपनीच्या सर्व क्रियाकलापांमध्ये क्षेपणास्त्रे, नौदल, टॉर्पेडो आणि पाण्याखालील खाणी यांचा समावेश होतो. अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीकडे सध्या DRDO ने दिलेल्या अनेक प्रलंबित प्रकल्पाचे काम आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Micro Systems Share Price NSE 24 November 2023.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x