 
						Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट म्हणजे सुप्रसिद्ध सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. जवळपास सर्वच वर्गातील ग्राहकांचा बँक ऑफ महाराष्टवर विश्वास आहे. त्यामुळे ग्राहक बँक ऑफ महाराष्टच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवून अपेक्षित परतावा कमाई करत आहेत. पण एकूण परतावा आकडेवारीचा विचार केल्यास बँक ऑफ महाराष्टचा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतं असल्याचं पाहायला मिळतंय.
जर बँकेच्या FD पासून ते RD योजनांच्या व्याजाची आकडेवारी पाहिल्यास आणि त्याची तुलना बँक ऑफ महाराष्टच्या शेअरमधून मिळणाऱ्या परताव्याशी केल्यास त्यात प्रचंड फरक पाहायला मिळतो. शेअर बाजारात गुंतवणुकीवर जोखीम लक्षात घेतली तरी बँक ऑफ महाराष्टची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचं पाहायला मिळतं. तसेच बँकेचा मागील ट्रॅक रेकॉर्ड आणि इतर टेक्निकल चार्टवर दिसणाऱ्या गोष्टी देखील सकारात्मक असल्याने भविष्यातही बँक ऑफ महाराष्टचा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देईल असंच दिसतं.
त्यामुळे ग्राहकांनी बँक ऑफ महाराष्टच्या FD पासून ते RD योजनांपासून बँक ऑफ महाराष्टच्या शेअरमध्ये गुंतवणुकीचा देखील विचार करणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ सुचवतात. कारण येथे मिळणारा परतावा बँक FD पासून ते RD योजनांपेक्षा कितीतरी पटीत आहे आणि पैसा महागाईच्या प्रमाणात वाढत असल्याने गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळतो. अगदी ग्राहकांनी १० हजार रुपयांपासून सुरुवात करून गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ भक्कम करणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ सांगतात. बँक ऑफ महाराष्ट शेअरच्या सध्याच्या भावाप्रमाणे म्हणजे 43 रुपये (प्रति शेअर) असा विचार केल्यास 9,460 रुपयात 220 शेअर्स खरेदी करता येऊ शकतात.
बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्सवर कालावधीनुसार गुंतवणूकदारांना झालेला फायदा
* बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी ५ वर्ष – फायदा मिळाला 233.08%
* बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी १ वर्ष – फायदा मिळाला 57.74%
* बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी ६ महिने – फायदा मिळाला 49.83%
* बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी YTD आधारावर – फायदा मिळाला 57.74%
बँक ऑफ महाराष्ट्र – सध्या शेअरची किंमत किती?
शुक्रवारी म्हणजे ट्रेडिंगच्या शेवटच्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्र शेअरचा भाव ४३.७५ रुपयांवर खुला झाला होता आणि बंद भाव ४३.७४ रुपये होता. दिवसभरात हा शेअर ४४.०७ रुपयांच्या उच्चांकी आणि ४३.३१ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. बँकेचे बाजार भांडवल ३०,८२५.२ कोटी रुपये आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ५१.९ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २२.८ रुपये आहे. दिवसभरात बीएसईचे वॉल्यूम 7,04,473 शेअर्स होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		