 
						Saksoft Share Price | सॅक्सॉफ्ट लिमिटेड या IT क्षेत्राशी संबंधित असलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 350 रुपयेच्या पुढे गेला आहे. ऑक्टोबर 2023 मधे सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने 399.40 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती.
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,507.50 कोटी रुपये आहे. एप्रिल 2013 पासून आतपर्यंत सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 रुपयेवरून वाढून 350 रुपयेच्या पार गेले आहेत. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 349.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.23 लाख रुपये झाले असते. सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनीचा इक्विटीवरील परतावा प्रमाण आर्थिक वर्ष 2022 मध्ये 19.86 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 2023 मध्ये 20.26 टक्क्यांवर पोहचला आहेत. कंपनीच्या परिचालन महसुलात वर्षानुवर्षे वाढ पाहायला मिळाली आहे. पूर्वी कंपनीचे परिचालन महसूल 163 कोटी रुपये होते, जे आता वाढून 190 कोटीवर पोहोचले आहेत. याच काळात कंपनीचा नफा 31 टक्क्यांनी 25 कोटींवर पोहोचला आहे.
लेटेस्ट शेअर होल्डिंग डेटानुसार सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांकडे एकूण 66.66 टक्के भाग भांडवल आहेत. तर परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी या कंपनीचे एकूण 3.96 टक्के भाग भांडवल धारण केले होते. कंपनीच्या किरकोळ गुंतवणूकदारांनी एकूण 24.36 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनी मुख्यतः IT संबधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटन मोठ्या प्रमाणात चालतो. मागील दहा वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10,130 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		