19 May 2024 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
x

BCL Industries Share Price | कंपनीला मोठी ऑर्डर मिळताच बीसीएल इंडस्ट्रीज शेअर्सची जोरदार खरेदी, शेअरची किंमत 61 रुपये

BCL Industries Share Price

BCL Industries Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 59.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 54 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1490 कोटी रुपये आहे.

बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 60.68 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 28.75 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.04 टक्के वाढीसह 61.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत, बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे पैसे 26 टक्के वाढवले आहेत.

5 जानेवारी 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 90 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 26 मार्च 2021 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या नीचांक किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत आता 500 टक्के वाढली आहे.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीला तेल विपणन कंपन्यांकडून इथेनॉलचा पुरवठा करण्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीला एकूण 3.5 किलो लिटर इथेनॉल पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तर फेब्रुवारी ते एप्रिल 2024 या कालावधीत कंपनीला 4.28 किलो लिटर इथेनॉलचा पुरवठा करायचे आहे.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीला तेल विपणन कंपन्यांकडून 8.20 लाख लिटर इथेनॉल पुरवठा करण्यासाठी 561 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीची सहयोगी कंपनी असलेल्या स्वच्छ डिस्टिलरी लिमिटेड कंपनीला मिळालेल्या ऑर्डरचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. स्वच्छ डिस्टिलरी लिमिटेड कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 0.1 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे, ज्याचे एकूण मूल्य 6.73 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Industries Share Price NSE 05 December 2023.

हॅशटॅग्स

#BCL Industries Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x