15 December 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

‘फनी’ चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्यावर थडकलं! लाखोंचे स्थलांतर

Odisa, Fani

भूवनेश्वर : सर्वाधिक घातक असे ‘फनी’ चक्रीवादळ आज सकाळी नऊच्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ताशी १७५ किलोमीटरच्या वेगाने ‘फनी’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले असून अकरा नंतर फनीचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ओडिशासह आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना ‘फनी’चा फटका बसण्याचा अंदाज आहे. गृहमंत्रालयाकडून १९३८ हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. पुरी आणि भुवनेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.

‘फनी’ चक्रीवादळचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. वादळामुळे कोलकाता आणि भुवनेश्वर विमानतळ बंद ठेवण्यात आले असून अंदाजे २२३ रेल्वे थांबवण्यात आल्या आहेत. ओदिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर, भुवनेश्वर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत ११ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x