20 April 2024 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

भारत मैत्री निभावतो तसं वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो - पंतप्रधान

Prime Minister Narendra Modi, Man Ki Baat, India China face off

नवी दिल्ली, २८ जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत आहेत. भारतावर कोरोनाचं संकट असताना, भारत कोरोनाशी सामना करत असतानाच यादरम्यान भारत शेजारील देशाकडून येणाऱ्या आव्हानांचाही सामना करत आहे. परंतु भारत मैत्री निभावतो तसं वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देत असल्याचं सांगत मोदींनी चीनला इशारा दिला आहे.

लडाखमध्ये चीनला भारताने करारा जवाब दिला आहे असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात म्हटलं आहे. आपल्या देशाकडे डोळे वटारुन पाहणाऱ्यांना भारताने धडा शिकवला आहे. भारतमातेकडे डोळे वर करुन पाहाल तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्यात आहे हे भारतीय जवानांनी दाखवून दिलं आहे. जे जवान शहीद झाले आहेत त्याबद्दल संपूर्ण देशाला अतीव दुःख आहे. मात्र ज्या कुटुंबातले जवान शहीद झाले त्यांनीही घरातल्या दुसऱ्या मुलांना सैन्यातच भरती करणार असं म्हटलं आहे. शहीदांच्या कुटुंबांबद्दल देशाला अभिमान आणि गर्व आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

आपण भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या जवानांचा अभिमान आहे. हुतात्म्यांसमोर संपूर्ण देश कृतज्ञ असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली आहे. 2020 हे वर्ष खराब असल्याची चर्चा सुरु आहे. 2020 या वर्षात अनेक आपत्ती, संकटं आली, संकट येतच असतात परंतु या आपत्तींमुळे संपूर्ण वर्षच खराब आहे हा विचार करणं चुकीचं असल्याचं मोदींनी सांगितलं.

ज्या कुटुंबातले जवान शहीद झाले त्यांनीही घरातल्या दुसऱ्या मुलांना सैन्यातच भरती करणार असं म्हटलं आहे. शहीदांच्या कुटुंबांबद्दल देशाला अभिमान आणि गर्व आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

 

News English Summary: In Ladakh, Prime Minister Narendra Modi today said that India has given an agreement to China. India has taught a lesson to those who turn a blind eye to their country.

News English Title: Prime Minister Narendra Modi Man Ki Baat India China face off News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x