21 May 2024 8:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

अजब उत्तर! मुंबईत पाणी तुंबलं नाही तर साचलं: महापौर विश्वनाथ महाडेश्वर

Shivsena, Mumbai Rain, Uddhav Thackeray

मुंबई : पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाली असल्याचं स्पष्ट करणाऱ्या शिवसेनाप्रणित मुंबई महागरपालिकेची पावसाळा सुरु होताच पोलखोल झाली आहे. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात होऊन २-३ दिवस झाले नसताना देखील काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मूंबईतील अनेक भाग पूर्णपणे जलमय झाल्याचं वृत्त आहे आणि त्यासंबंधित व्हिडिओ देखील स्वतः सामान्य नागरिकच समाज माध्यमांवर शेअर करून संतप्त भावना व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आज मुंबईत प्रवासादरम्यान प्रसार माध्यमांनी मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना याविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी हा दावा पूर्णपणे व कॅमेरा अमान्य केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी थेट तुंबलं आणि साचलं यातील फरक स्पष्ट करण्याचा पाढाच वाचण्यास सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत सर्वकाही सुरळीत असून वाहतूक सेवा देखील उत्तम असून, सामान्य मुंबईकरांचे दैनंदिन व्यवहार देखील रोजच्या प्रमाणे सुरु असल्याचं म्हटलं आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नालेसफाई झाल्याने कोणत्याही समस्या उद्भवणार नसल्याचा दावा यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक फलदायी ठरू शकतील अशा विषयांवर पत्रकार परिषदा आयोजित करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या या विषयावर समोर आलेले नाहीत. कदाचित पाऊस पूर्णपणे थांबल्यावर आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ते कॅमेरासमोर येतील जसं ते प्रत्येक पावसाळ्यात करतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरातील नालेसफाईची कामं १००% टक्के झाल्याचं सामनातून भाष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंची पोलखोल झाली आहे असंच नागरिकांचं मत आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवरून सामनातून नेमकी कोणती बातमी आली होती?

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x