
Net Avenue Technologies IPO | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 16-18 रुपये किंमत बँडवर लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO लाग 511 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे.
नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये देखील जबरदस्त कामगिरी करत आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 100 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी मालामाल करू शकतात. तज्ञांच्या मते हा स्टॉक 36 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.
नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 16-18 रुपये किंमत बँडवर ओपन झाला होता. त्यावेळी ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 18 रुपये प्रीमियम किमतीवर खरेदी विक्री केले जात होते. नंतर ग्रे मार्केटमध्ये नेट अव्हेन्यू IPO शेअरची किंमत वाढली आणि शेअर 36 रुपये प्रीमियम किमतीवर पोहचला.
ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये या कंपनीचे शेअर्स वाटप केले जातील, त्यांच्या गुंतवणुकीचे मुख्य स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 100 टक्के वाढतील. 7 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना वाटप केले जातील आणि 12 डिसेंबर 2023 रोजी स्टॉक सूचीबद्ध केले जातील.
नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO एकूण 511.21 पट सबस्क्राइब झाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 721.89 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. आणि गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 616.25 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 61.99 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉट खरेदी करू शकत होते. नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO अंतर्गत एका लॉटमध्ये 8000 शेअर्स ठेवले होते. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 144000 रुपये जमा करावे लागले होते. नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ लाँच होण्यापूर्वी कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा 45.31 टक्के होता, जो 33.28 टक्केवर आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.