7 May 2025 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

Net Avenue Share Price | याला म्हणतात नशीब! 18 रुपयाच्या शेअरने एकदिवसात दिला 121 टक्के परतावा

Net Avenue Share Price

Net Avenue Share Price | नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 133 टक्के प्रीमियम वाढीसह 42 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजीज कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 16-18 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 18 रुपये अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आले आहेत.

ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ स्टॉक वाटप करण्यात आला, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य पहिल्याच दिवशी दुप्पट झाले आहेत. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजीज स्टॉक 121.67 टक्के प्रीमियम वाढीसह 39.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स लिस्टिंगनंतर किंचित घसरले होते. स्ट्राँग लिस्टिंगनंतर गुंतवणुकदारांना नफा वसुलीला सर्वात केली होती. नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर लिस्टिंग किमतीच्या तुलनेत 5 टक्के घसरले आणि 39.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजीज कंपनीचा IPO 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO चा आकार 10.25 कोटी रुपये होता. IPO पूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 45.31 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर IPO नंतर हे प्रमाण 33.28 टक्के वर आले होते.

नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजीज कंपनी आपल्या IPO मधून जमा केलेली रक्कम ग्राहक संपादन आणि खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे. नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजीज कंपनीचा IPO एकूण 511.21 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 721.89 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 616.25 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 61.99 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये फक्त एक लॉट खरेदी करू शकत होते. एका लॉट मध्ये कंपनीने 8000 शेअर्स ठेवले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Net Avenue Share Price NSE 09 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Net Avenue Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या