
Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या चीफ ग्रोथ ऑफिसर स्टेफनी ट्रॉटमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे सोमवारी विप्रो कंपनीचे शेअर्स एक टक्क्यानी कमजोर झाले होते. कंपनीच्या व्यवसायात किंचित प्रगती झाल्यामुळे शेअरमध्ये थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.
विप्रो कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.39 टक्क्यांच्या घसरणीसह 420.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विप्रो कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 422.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2023 या वर्षात विप्रो कंपनीच्या उच्च पदावरील 9 अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. चीफ ग्रोथ ऑफिसर स्टेफनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या कंपनीचे चीफ ग्रोथ ऑफिसर मोठ्या डीलची टीम मॅनेज करण्याचे काम करत होते. दोन महिन्यांपूर्वी विप्रो कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जतिल दलाल यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊन नोकरी सोडली होती. 2023 या वर्षात विप्रो कंपनीच्या उच्च स्तरावरील नऊ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मागील 12 महिन्यांत विप्रो कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. कंपनीच्या CGO च्या राजीनाम्यानंतर ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने विप्रो कंपनीच्या रेटिंगचे पुनर्विलोकन करून कंपनीचे रेटिंग कमी केले आहे.
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या मते, विप्रो कंपनीचे शेअर्स पुढील काळात 370 रुपये किमती पर्यंत घसरू शकतात. 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 351.85 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सध्या विप्रो स्टॉक आपल्या उच्चांक किमतीवरून 5 टक्क्यांनी घसरले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.