12 December 2024 6:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

Gold Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, आजचे सोन्याचे नवे दर पाहून विचारात पडाल

Highlights:

  • Gold Price Today
  • सोन्या-चांदीच्या दरात वाढ
  • सोन्याचे दर किती वाढले?
  • आपल्या शहराची किंमत तपासा
  • खरेदी करण्यापूर्वी हे तपासा
Gold Price Today

Gold Price Today | सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीनंतर आज तेजी दिसून आली आहे. सोने आणि चांदी आज महाग झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक ते नागपूर अशा सराफा बाजारातून सोने खरेदी करणाऱ्यांना आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. शेअर बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर देशातील सराफा बाजारात शनिवारी सोन्याच्या भावाने ६०,६०० रुपयांचा टप्पा ओलांडला. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात वाढ

सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,600 रुपयांवर पोहोचला आहे. मागील सत्रात सोने 60,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीचा भाव सुद्धा 650 रुपयांनी वाढून 73,550 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे, जो मागील सत्रात 73,550 रुपये प्रति किलोग्राम होता.

सोन्याचे दर किती वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी सांगितले की, देशातील प्रमुख सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव 350 रुपयांनी वाढून 60,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,976 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव 23.27 डॉलर प्रति औंस होता. अमेरिकी डॉलर विनिमय दरात झालेली घसरण आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुढील बैठकीत धोरणात्मक दर कायम ठेवेल, या अपेक्षेमुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली.

आपल्या शहराची किंमत तपासा

तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही फक्त 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.

खरेदी करण्यापूर्वी हे तपासा

जर तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Updates check details on 03 June 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x