 
						IREDA Share Price | IREDA कंपनीचे शेअर नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. लिस्टिंग झाल्यापासुन या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 100 रुपये किमतीच्या पार गेले होते.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी IREDA स्टॉक 9.97 टक्के वाढीसह 112 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारात स्टॉक लिस्टींग झाल्यापासून IREDA कंपनीचे शेअर्स आपल्या 32 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 218 टक्के वाढले आहेत. IREDA कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या कंपनीचा IPO 32 रुपये किमतीवर शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या सरकारी कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. अवघ्या दहा पेक्षा कमी ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत तिप्पट वाढली आहे.
केजरीवाल रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या तज्ञांच्या मते, काही वर्षांपूर्वी IRFC कंपनीचा IPO स्टॉक 26 रुपये किमतीवर शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. तर आता या कंपनीचे शेअर्स 80 रुपयेच्या वर गेले आहेत. म्हणजेच मागील 6 ते 12 महिन्यांपासून शेअर बाजारातील सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार गुंतवणूक पाहायला मिळत आहे. अनेक सरकारी कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		