 
						Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यापासून तेजी पाहायला मिळत होती. मात्र शुरकवारी या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मागील एका महिनाभरात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 28 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडलेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत कंपनीच्या व्यवस्थापनाने आपली दीर्घकालीन योजना जाहीर केली होती.
त्यानंतर गुंतवणूकदारांनी टाटा पॉवर स्टॉक मोठ्या खरेदी करायला सुरुवात केली. ब्रोकरेज फर्म देखील टाटा पॉवर स्टॉकवर उत्साही पाहायला मिळत आहे. शेअरखान फर्मने या स्टॉकवरील टार्गेट प्राइस 35 टक्क्यांनी वाढवली आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.66 टक्के घसरणीसह 333.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 285 रुपयेवरून वाढवून 390 रुपये केली आहे. शेअरची सध्याची किंमत टार्गेट प्राइसच्या तुलनेत 16 टक्के कमी आहे. मागील एका महिन्यापासून टाटा पॉवर स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा वीज क्षेत्रातील कंपन्यांना होऊ शकतो.
टाटा पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2027 पर्यंत महसूल नफा दुप्पट करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारत सरकारने आर्थिक वर्ष 2031-32 पर्यंत थर्मल पॉवर निर्मिती क्षमता 80 GW आणि अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता 321 GW साध्य करण्याचे अक्षय निर्धारित केले आहे.
टाटा पॉवर कंपनीने वार्षिक 1.5-2 GW ने अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2030 पर्यंत टाटा पॉवर कंपनीच्या एकूण वीज उत्पादनापैकी 70 टक्के वाटा अक्षय ऊर्जेचा असेल. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत कंपनीचा महसूल, नफा आणि EBITDA दुप्पट करण्याचे लक्ष्य कंपनीने जाहीर केले आहे. यामुळेच टाटा पॉवर स्टॉक तेजीत वाढत आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर 333 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 26 टक्के वाढली आहे. आणि 2023 या वर्षात टाटा पॉवर स्टॉकने गुंतवणूकदारांना 60 टक्के नफा दिला आहे. मागील तीन वर्षांत टाटा पॉवर स्टॉकने गुंतवणूकदारांना 350 टक्क्यांपेक्षा जास्त नफा दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		