18 May 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या
x

SBC Exports Share Price | शेअरची किंमत 30 रुपये! फुकट शेअर्सची मिळविण्याची संधी, अल्पावधीत कमाई होईल

SBC Exports Share Price

SBC Exports Share Price | एसबीसी एक्सपोर्ट कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. एसबीसी एक्सपोर्ट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 657 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.45 रुपये होती. आहे.

मागील 5 दिवसात एसबीसी एक्सपोर्ट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत एसबीसी एक्सपोर्ट कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 रुपयेवरून 54 टक्क्यांनी वाढली होती. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी एसबीसी एक्सपोर्ट स्टॉक 0.33 टक्के घसरणीसह 30.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

2023 या वर्षात एसबीसी एक्सपोर्ट कंपनीने आपल्या शेअर धारकांना 104 टक्के बंपर परतावा कमावून दिला आहे. 17 मार्च 2022 रोजी एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 4.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमती वरून गुंतवणूकदारांनी तब्बल 600 टक्के परतावा कमावला आहे. 5 डिसेंबर 2023 रोजी एसबीसी एक्सपोर्ट कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती.

या बैठकीत कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे दोन इक्विटी शेअर्स असतील, त्यांना कंपनी एक इक्विटी शेअर मोफत देणार आहे. मात्र कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.

एसबीसी एक्सपोर्ट या कंपनीची स्थापना गणेश प्रसाद गुप्ता यांनी 1991 साली केली होती. ही कंपनी सुरुवातीला हाताने तयार केलेले कार्पेट्स, डिश कव्हर्स, कॉटन क्विल्ट्स आणि बेडशीट्स बनवण्याचा व्यवसाय करत होती. मात्र नंतर हळूहळू कंपनीने उत्तर प्रदेशातील मिर्झापूर आणि साहिबााबाद औद्योगिक क्षेत्रात आपले उत्पादन युनिट स्थापन केले. आणि होजियरी फॅब्रिक आणि कपड्यांचा व्यवसाय करायला सुरुवात केली.

ऑक्टोबर 2023 मध्ये एसबीसी एक्सपोर्ट कंपनीने सांगितले होते की त्यांना भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 78 लाख रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत एसबीसी एक्सपोर्ट कंपनीला ऑफिस सपोर्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सपोर्ट आणि रोल आउट सेवा संबंधित 37 लाख रुपये मूल्याचे काम देण्यात आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBC Exports Share Price NSE 19 December 2023.

हॅशटॅग्स

#SBC Exports Share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x