
Stocks To Buy | ITC कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी जबरदस्त तेजीत वाढत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ITC कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअर होल्डर असलेल्या ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनीने स्टॉक विक्रीची घोषणा केली आहे. मात्र तरीही ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीज ITC स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे.
अनेक तज्ञांनी ITC कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. अमेरिकन गुंतवणुकदार कंपनीद्वारे होणाऱ्या शेअर विक्रीचा ITC कंपनीच्या शेअरवर कोणताही परिणाम होणार नाही. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी ITC स्टॉक 1.30 टक्के घसरणीसह 450.15 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
जेफरीज फर्मच्या मते, ITC कंपनीचे शेअर्स पुढील काळात 530 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 18 डिसेंबर 2023 रोजी ITC स्टॉक 451 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तज्ञांच्या मते, सध्याच्या किंमतीच्या तुलनेत आयटीसी स्टॉक आणखी 17-18 टक्क्यांनी वाढू शकतो. 2023 या वर्षात आयटीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 38 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांत आयटीसी कंपनीच्या शेअर्सची किंमत 106 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या मते, BAT कंपनी आपली ITC कंपनीमधील भागीदारी 25 टक्क्यांच्या खाली आणण्यांची शक्यता आहे. त्यामुळे आयटीसी हॉटेल्स कंपनी BAT चा हिस्सा देखील कमी होणार आहे. सध्या स्टॉक व्हॉल्यूममध्ये घट आणि प्रचंड कर्ज यामुळे BAT कंपनी आर्थिक समस्यांना सामोरे जात आहे. BAT कंपनीचे मुल्यांकन P/E 6 पट अधिक घसरले आहे. BAT कंपनीचे एकूण बाजार भांडवल देखील मोठ्या प्रमाणात घटले आहे.
ITC कंपनीच्या सर्वात मोठ्या स्टॉक धारक असलेल्या ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनीने आयटीसी कंपनीच्या सिगारेट आणि हॉटेल्स व्यवसायातील गुंतवणूक कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. BAT ही कंपनी जगातील सर्वात मोठी तंबाखू कंपनी मानली जाते. आणि तिने ITC कंपनीमध्ये 29 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.