27 April 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार
x

Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.98 टक्के वाढीसह 22.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 33.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 28 मार्च 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 9.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

23 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 274.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2008 नंतर रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 99 टक्क्यांनी घसरले होते. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर आले होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 23.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील काही दिवसांपासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रिलायन्स पॉवर कंपनीने 14 मार्च 2024 रोजी ICICI बँक सोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत, रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीची प्रवर्तक असलेल्या रिलायन्स इन्फ्रा कंपनीने आर्थिक प्रक्रियेसाठी कॉर्पोरेट हमीदार बनण्यास सहमती दर्शवली आहे.

डिसेंबर 2023 पर्यंत रिलायन्स पॉवर कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 24.49 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 75.51 टक्के भाग भांडवल धारण केले होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे प्रवर्तक अनिल अंबानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे 4,65,792 शेअर्स आहेत. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे रिलायन्स पॉवर कंपनीचे 93,01,04,490 शेअर्स आहे. हे प्रमाण एकूण भाग भांडवलाच्या 24.40 टक्के हिस्सा आहे. अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांनी देखील रिलायन्स पॉवर कंपनीचे 4,12,708 शेअर्स होल्ड केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 18 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x