9 May 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं? Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान? Tax Saving Mutual Funds | पगारदारांनो! वर्षानुवर्षे पैशांचा वर्षाव करणाऱ्या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा
x

Ircon Share Price | एका वर्षात 309 टक्के परतावा देणारा शेअर सुसाट वाढणार, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली

Ircon Share Price

Ircon Share Price | मागील एका वर्षात इरकाँन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीला एक मोठी ऑर्डर देखील मिळाली आहे. ही ऑर्डर राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड म्हणजेच NHIDCL कडून देण्यात आली आहे. या ऑर्डर अंतर्गत इरकाँन कंपनीला मिझोराममध्ये बोगदा बांधण्याचे काम मिळाले आहे. ( इरकाँन कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इरकाँन कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी इरकाँन कंपनीचे शेअर 0.46 टक्के घसरणीसह 215.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सेबीला दिलेल्या माहितीत इरकाँन कंपनीने कळवले आहे की, त्यांना NHIDCL ने मिझोरममध्ये EPC मोडमध्ये बोगदा बांधण्याची जबाबदारी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत, NH 6 वर 2.5 किमी लांबीचा ट्विन ट्यूब युनि-डायरेक्शनल आयझॉल बायपास बोगदा बांधण्याचे काम पूर्ण करायचे आहे. यासोबत बोगद्यात प्रवेश करण्यासाठी 2.1 किमी लांबीचा रस्ता देखील बांधणे अपेक्षित आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 630.6 कोटी रुपये असेल. आणि काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 36 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इरकाँन कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 217 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 309 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात इरकाँन स्टॉक तब्बल 409 टक्के मजबूत झाला आहे. मागील 3 महिन्यांत इरकाँन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने एकूण 2884 कोटी रुपये मूल्याची सेल्स केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यात 23 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत इरकाँन कंपनीने 244.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. यात मागील वर्षीच्या तुलनेत 29 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या EBITDA मध्ये 41 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ircon Share Price NSE Live 18 March 2024.

हॅशटॅग्स

IRCON Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x