4 May 2025 5:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Adani Power Share Price | अदानी ग्रुपला 6 लाख करोडचा झटका, काही शेअर्स 74% टक्क्यांनी घसरले, पण 2 शेअर्स तेजीत

Adani Power Share Price

Adani Power Share Price | गौतम अदानी यांच्या उद्योग समुहा विरोधात जानेवारी 2023 या महिन्यात हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने एक वादग्रस्त अहवाल प्रकाशित केला होता. या वादानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपनीचे शेअर्स क्रॅश झाले होते. त्यातून अदानी समूह पूर्णपणे सावरला नाहीये. 2023 हे वर्ष संपत आले आहे, आणि या काळात अदानी समूहाला जवळपास 6 लाख कोटी रुपये मार्केट कॅप गमवावे लागले आहे.

2022 या वर्षाच्या अखेरीस अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 19.6 लाख कोटी रुपये होते. तर सध्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार अदानी समुहाचे बाजार भांडवल 13.6 लाख कोटीवर आले आहे. एका वर्षाच्या आत अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स हिंडेनबर्ग अहवालानंतर तोट्यातून सावरले आहेत.

अदानी टोटल गॅस स्टॉक YTD आधारे 74 टक्के घसरले आहेत. एका वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 4000 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. तसेच अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स देखील आपल्या एका वर्षापूर्वीच्या किमतीच्या तुलनेत 61 टक्के खाली ट्रेड करत आहेत.

खाद्यतेल आणि पॅकेज्ड किराणा मालाच्या फॉर्च्युन ब्रँडची मालकी असलेल्या अदानी विल्मर कंपनीचे आपल्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 44 टक्के खाली ट्रेड करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार अदानी समूह आपल्या अनेक बहुराष्ट्रीय ग्राहकोपयोगी FMCG फर्ममधील आपला संपूर्ण 43.97 टक्के भाग भांडवल विकण्यासाठी बोलणी करत आहेत.

अंबुजा सिमेंट कंपनीचे मार्केट कॅप मागील एका वर्षात 6 टक्के घसरले आहेत. तर अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरची किंमत 28 टक्के पडली आहे. अदानी ग्रीन एनर्जी आणि एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स देखील आपल्या मागील वर्षीच्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 24-25 टक्के कमजोर झाले आहेत. अदानी समुहाचा भाग असेलल्या एसीसी आणि अंबुजा सिमेंट या दोन सिमेंट कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वात कमी घसरण पहायला मिळाली होती.

ACC कंपनीचे बाजार भांडवल सध्या 15 टक्के कमी झाले आहेत. तर अंबुजा कंपनीचे बाजार भांडवल 6 टक्के घटले आहे. यासह अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात आपल्या उच्चांक किमतीवरून 24 टक्के घसरले आहेत. तर अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षातील घसरणीनंतर 70 टक्क्यांनी सावरले आहेत. शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 511.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नुकताच अदानी-हिंडेनबर्ग वादाशी संबंधित याचिकांवर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे मागील एका महिन्यात अदानी समुहाचे शेअर्स प्रचंड तेजीत वाढत आहेत. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 64 टक्के मजबूत झाले आहेत.

2030 पर्यंत अदानी ग्रीन कंपनीने 45 गिगावॅट ग्रीन एनर्जी क्षमता निर्माण करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ पुढील काळात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE 23 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या