19 May 2024 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Money From Shares | फुल्ल स्पीडमध्ये पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 50 टक्के परतावा दिला, खरेदीकरून पैसे वाढवणार?

Multibagger Stock

Money From Shares | JK Tyre & Industries या टायर निर्माता कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील काही महिन्यांत गगनाला भिडली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या टायर कंपनीच्या शेअरने आपली सार्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. JK टायरच्या शेअरच्या किमतीत मागील 5 महिन्यांमध्ये दुप्पट वाढ पहायला मिळाली आहे.

3 महिन्यांत गुंतवणूक 50 टक्क्यांनी वाढली
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये JK टायर कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 5 टक्क्यांच्या वाढीसह 203.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन दिवसांत जेके टायर कंपनीच्या शेअरच्या किमतीत 18 टक्क्यांची जबरदस्त वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 3 महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 50 टक्क्यांनी वाढले आहे. जून 2022 मध्ये JK टायर कंपनीच्या शेअरने 96.40 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 112 टक्क्यांनी वधारली आहे. त्याच वेळी आज या कंपनीच्या शेअर्सची ओपनिंग 0.43 टक्क्यांच्या वाढीसह झाली असून स्टॉक 196.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.

जेके टायर ही कंपनी डॉ . ए पी सिंघानिया यांच्या नेतृत्वाखालील जेके ग्रुपचा एक भाग आहे. भारतातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनीच्या यादीत जेके टायर या कंपनीचा देखील समावेश होतो. जगातील 25 सर्वात मोठ्या टायर उत्पादक कंपन्यांच्या यादीत जेके टायर आपले स्थान राखून आहे. कंपनी विविध प्रकारच्या टायरचे उत्पादन करते. ही कंपनी ट्रक,बस, ट्रॅक्टर, कार, मोटारसायकल यासारख्या वाहनांसाठी टायर निर्मिती करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money From Shares of JK Tyre & Industries share price has increased on 1 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x