 
						Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअरचा लाभ घेऊ इच्छित असाल तर, तुम्ही स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. नुकताच स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना एका शेअरवर 2 मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Standard Capital Markets Share Price
यासह ही कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करत करणार आहे. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 100 रुपयांपेक्षा स्वस्त आहेत. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 78.03 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि कंपनी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअर्सवर बोनस म्हणून 2 शेअर वाटप करणार आहे.
या बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 29 डिसेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच या दिवशी ज्या लोकांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा फायदा दिला जाईल.
आज या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षभरात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 337 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 29 टक्क्यांनी वाढली आहे.
मागील एका महिन्यात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 39 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 96 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.57 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		