 
						Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच हिंडनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाला मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे अदानी समुहाचे जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मागील दोन दिवसांपासून, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट हे दोन्ही स्टॉक निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये विराजमान झाले आहेत.
अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही अदानी पोर्ट स्टॉक खरेदी करू शकता. कारण पुढील काही दिवसात अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स 1200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी अदानी पोर्ट स्टॉक 2.96 टक्के वाढीसह 1,126.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
20 डिसेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट कंपनीच्या शेअर्स चार्टमध्ये मजबूत तेजीची कँडल तयार झाली होती. सध्या अदानी पोर्ट कंपनीच्या शेअर्सने 1100 रुपये किंमत पार केली आहे. आणि हा स्टॉक आणखी तेजीत वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 20 डिसेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट शेअरमध्ये एका दिवसात 72 रुपये घसरण पहायला मिळाली होती. त्यानंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट स्टॉक मजबूत तेजीसह क्लोज झाला होता. पुढील काही दिवसांत अदानी पोर्ट स्टॉक 1150 रुपये किमतीवर जाईल.
अदानी पोर्ट कंपनीच्या स्टॉकमध्ये 1000 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट स्टॉक चार्टमध्ये दर 15 मिनिटांच्या कालावधीत सतत तेजीची कँडल तयार करत आहे. मागील एका महिन्यात अदानी पोर्ट स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यात या स्टॉकची किंमत 51 टक्के वाढली आहे. ज्या लोकांनी एका वर्षापूर्वी अदानी पोर्ट स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 39 टक्के वाढले आहेत. YTD आधारे अदानी पोर्ट स्टॉक 9 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		