12 December 2024 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Integra Essentia Share Price | 11 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल! 5 दिवसांत दिला 48% परतावा, वेळीच खरेदी करणार?

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट खरेदी पाहायला मिळाली. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 10.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. इंटेग्रा एसेंशिया या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 487 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये LIC सारख्या दिग्गज कंपनीने देखील गुंतवणूक केली आहे.

इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स आज आपल्या 52-आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. तर या स्टॉकची नीचांक किंमत पातळी 5.30 रुपये होती. नीचांक किमतीवरून इंटेग्रा एसेंशिया स्टॉकने लोकांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 5 दिवसांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स तब्बल 48 टक्के वाढले आहेत. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 62 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 9.91 टक्के वाढीसह 11.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 6 महिन्यांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 66 टक्के नफा कमावून दिला आहे. 25 ऑगस्ट 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 5.30 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 100 टक्के मजबूत झाला आहे. LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे एकूण 48.59 लाख शेअर्स होल्ड केले आहेत. म्हणजेच LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे एकूण 1.06 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

नुकताच इंटेग्रा एसेंशिया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 11 जानेवारी 2024 हा दिवस रेकॉर्ड तारख म्हणून निश्चित केला आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. 27 नोव्हेंबर 2023 रोजी इंटिग्रा एसेन्शिया कंपनीच्या संचालक मंडळाने पार पडलेल्या बैठकीत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.

14 सप्टेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीला प्रीमियम तांदूळ आणि काजूचा पुरवठा करण्यासाठी 12 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे. यावर्षी इंटेग्रा एसेंशिया कंपनीने 270 कोटी रुपयेची सेल्स केली आहे. चालू आर्थिक वर्षात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या एकूण विक्रीत 15 टक्के वाढ होऊ शकते. नवी दिल्लीस्थित इंटेग्रा एसेंशिया कंपनी मुख्यतः अन्न आणि ऊर्जा संबंधित व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE Live 04 January 2024.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x