18 May 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

RVNL Share Price | अल्पावधीत 670 टक्के परतावा देणाऱ्या RVNL शेअर्सबाबत मोठी अपडेट, शेअर्स सुसाट तेजीत

RVNL Share Price

RVNL Share Price | आरवीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरवीएनएल कंपनीचे शेअर्स 4.4 टक्के वाढीसह 188.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर शेअरमध्ये किंचित नफा वसुली झाली. आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत.

आरवीएनएल स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एका स्टेशनच्या पुनर्विकासाचे 123 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. या काँट्रक्टची पूर्तता करण्याचा कालावधी 30 महिने आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी आरवीएनएल स्टॉक 0.24 टक्के वाढीसह 185.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच आरवीएनएल कंपनीने REC कंपनीसोबत एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टैंडिंग करार केला आहे. या करारांतर्गत REC कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी आरवीएनएल कंपनीला 35,000 कोटी रुपये वित्तपुरवठा करण्यास सहमती दिली आहे.

हा करार मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब, रेल्वे पायाभूत सुविधा, रस्ते, बंदरे आणि मेट्रो प्रकल्पांसह अनेक प्रकल्पांसाठी करण्यात आला आहे. यासह आरवीएनएल कंपनीला आणखी एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. डिसेंबर 2023 मध्ये आरवीएनएल कंपनीला इंदूर मेट्रो संबंधित काम करण्यासाठी 543 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.

आरवीएनएल कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत आरवीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 420 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन वर्षांत आरवीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना 670 टक्के परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये आरवीएनएल कंपनीने 394.3 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षी आरवीएनएल कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 4,908.9 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत आरवीएनएल कंपनीने 4,914.3 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. आरवीएनएल कंपनीची EBITDA पूर्वीची कमाई वार्षिक 315.9 कोटी रुपयेवरून सप्टेंबर 2023 तिमाहीत 5.6 टक्के घसरणीसह 298 3 कोटी रुपयेवर आली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 05 January 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x