9 May 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं? Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान?
x

Tata Steel Share Price | टाटा ग्रुपचा पोलादी शेअर! टाटा स्टील शेअर्समध्ये जोरदार तेजी येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात पैसे लावत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने तेजीसह सुरुवात केली होती. 1 जानेवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 142 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकबाबत थोडे सावध राहण्याचा सल्ला गुंतवणुकदारांना दिला आहे.

काही ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवी ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 145 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 134.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील वर्षी मार्च 2023 मध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 101.65 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 9 महिन्यांपासून टाटा स्टील स्टॉक 100-142 रुपये किमती दरम्यान ट्रेड करत आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने दिलेल्या माहितीनुसार मागील दोन महिन्यांत टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 7 टक्के वाढली आहे. तर मागील सहा महिन्यांत या स्टॉकची किंमत 23 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोकिंग कोळशाच्या किमती डिसेंबर 2023 तिमाहीत 300-350 डॉलर्स प्रति टन या दरावर होते. आणि ऑस्ट्रेलियातील पुरवठा खंडित झाल्यामुळे किमती त्याच्या किमतीत अधिक वाढ झाली.

भारत सरकारने पायाभूत विकासावर भर दिल्याने स्टीलच्या मागणीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. कोरोनाची जागतिक महामारी, युद्ध, आणि इतर नकारात्मक समस्या आल्यानंतरही पोलाद उद्योगात सुधारणा पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, 2023 मध्ये स्टीलच्या मागणीत 10 ते 12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. मात्र, चीनमधून होणारी स्टीलची आयात वाढण्याची भीती देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे. 2023 या वर्षात चीनकडून दर महिन्याला 8 दशलक्ष टन पोलाद निर्यात केले जात होते.

2015 नंतर ही सर्वात उच्चांक निर्यात पातळी आहे. याचा परिणाम स्टील उद्योगाच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर तसेच देशातील कंपन्यांच्या नफ्यावर पाहायला मिळतो. टाटा स्टील कंपनीला धातू बाजारातील मोठा वाटा काबीज करण्यासाठी वार्षिक उत्पादन क्षमता 10 ते 20 लाख टनांनी वाढवावी लागणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 05 January 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x