Arvind Share Price | लकी ठरला IPO शेअर! पहिल्याच दिवशी दिला 78 टक्के परतावा, आता खरेदी करावा का?
Arvind Share Price | अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सी कंपनीचे शेअर्स 80 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 45 रुपये निश्चित केली होती. IPO किमतीच्या तुलनेत अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सी कंपनीचे शेअर्स 78 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी अरविंद अँड कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना स्टॉक लिस्टिंगमधून 35 रुपये नफा मिळाला आहे.
अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सी कंपनीचे शेअर्स NSE SME या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात आले होते. आज गुरूवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सी कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 76.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सी कंपनीच्या IPO ला गुंतवणुकदारांनी मजबूत प्रतिसाद दिला होता. या कंपनीचा IPO एकूण 385 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 321.97 पट अधिक सबस्क्राइब करण्यात आला होता. तर IPO च्या इतर राखीव श्रेणींला 436.05 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले होते.
अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सी कंपनीचा IPO लाँच होण्यापूर्वी कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 100 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आता IPO नंतर प्रवर्तकांचा वाटा 73 टक्केवर आला आहे. अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सी कंपनीने आपल्या IPO जमा केलेले पैसे भांडवली खर्चासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी खर्च केले होते.
अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सी कंपनीचा IPO स्टॉक 12 ऑक्टोबर 2023 ते 16 ऑक्टोबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 19 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीने आपल्या शेअर धारकांना शेअर वाटप केले होते.
किरकोळ गुंतवणूकदारांना या कंपनीच्या IPO मध्ये फक्त 1 लॉट खरेदी करण्याची मुभा देण्यात आली होती. तर कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉटमध्ये 3000 शेअर्स ठेवले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना या IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 135,000 रुपये जमा करावे लागले होते. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 14.74 कोटी रुपये होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Arvind Share Price NSE 26 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News