
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएएल कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 3038.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
एचएएल या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2 लाख कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सकाळी एचएएल स्टॉक 3038.60 रुपये किमतीवर ओपन झाला होता. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी एचएएल स्टॉक 3.30 टक्के वाढीसह 3,000 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
मागील एका वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत एचएएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 18 टक्क्यापेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा 71.60 टक्के भाग भांडवल वाटा भारत सरकारने धारण केला आहे. यामधे सिंगापूर सरकारने देखील 1 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ही सरकारी कंपनी वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देखील वाटप करते. 2023 यावर्षात एचएएल कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 35 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.