12 December 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Tata Consumer Products Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांनी दिला हा शेअर खरेदीचा सल्ला, तेजीचे कारण काय?

Tata Consumer Products Share Price

Tata Consumer Products Share Price Today | सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आकर्षक आणि फायदेशीर शेअर म्हणजे टाटा समूहाचे शेअर्स. तुम्ही जर गुंतवणूकीचा विचार करत असाल तर सध्या ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स आकर्षक किमतीवर उपलब्ध आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, ‘टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात जबरदस्त परतावा देऊ शकतात.

Tata Consumer Products Limited Stock Price Today on NSE & BSE

कंपनीने आपले लक्ष व्यापार वाढीवर केंद्रित केले आहे. कंपनीचे वितरक नेटवर्क वेगाने विस्तारत व्यापाराला अधिक चालना मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 758.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीने 21.12 टक्के वाढीसह 289.56 कोटी रुपये परतावा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने 239.05 कोटी रुपये प्रॉफिट कमाई केली होती. ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ ही कंपनी पूर्वी ‘टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेड’ या नावाने ओळखली जात होती.

समीक्षाधीन तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात 13.96 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 3,618.73 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाही कालावधीत कंपनीने 3,175.41 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कालावधीत कंपनीचा खर्च 14.11 टक्क्यांच्या वाढीसह 3,217.58 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा कंझ्युमर स्टॉकबद्दल उठास व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरवर 910 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

आर्थिक वर्ष 2023-25 मध्ये या कंपनीचा महसूल, EBITDA आणि PAT CAGR अनुक्रमे 9 टक्के, 15 टक्के, आणि 24 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने चहा, मीठ आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित समस्यांचे कारण देत कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 900 रुपये निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Consumer Products Share Price Today on 28 April 2023.

हॅशटॅग्स

#Tata Consumer Products Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x