
IRFC Share Price | चालू आर्थिक वर्षांची शेवटची तिमाही सुरू झाली आहे. या तिमाहीत भारत सरकार आपल्या मालकीच्या कंपनीमध्ये निर्गुतवणुक करण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारत सरकार माझगाव डॉक शिपबिल्डर, NLC इंडिया आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स विकण्याचा विचार करत आहे. 31 मार्च 2024 पूर्वी भारत सरकार या तिन्ही कंपनीमधील किमान 10 टक्के वाटा विकण्याचा विचार आहे. याबातमी मुळे नक्कीच या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये खळबळ उडाली आहे.
आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी IRFC कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 100.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर माझगाव डॉक कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के घसरणीसह 2,234.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर NCL लिमिटेड कंपनीचे शेअर्स आज 1.49 टक्के घसरणीसह 221.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
चालू आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत भारत सरकारने निर्गुतवणुकीद्वारे 51000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. आतापर्यंत चालू आर्थिक वर्षात भारत सरकारने 10,051,73 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे.
या तिन्ही कंपन्यांचे शेअर्स विकून सरकारला 21200 कोटी रुपये मिळतील. मागील एका वर्षात Mazagon Dock Shipbuilder आणि NLC India या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची किंमत 177 टक्क्यांनी वाढली होती. तर IRFC कंपनीच्या शेअर्सची किंमत एका वर्षात फक्त 0.4 टक्के वाढली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.