18 May 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Advik Capital Share Price | चिल्लरही श्रीमंत करते! शेअरची किंमत फक्त 4 रुपये, मागील 5 दिवसात 75% परतावा दिला

Advik Capital Share Price

Advik Capital Share Price | अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात विक्रीचा दबाव निर्माण झाला होता.

मात्र आज शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. तर, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, बीपीसीएल आणि एनटीपीसीचे, यूपीएल, डिवीज लॅब आणि एसबीआय लाइफ कंपनीचे शेअर्स घसरले होते. आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 9.79 टक्के वाढीसह 4.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 9.88 टक्क्यांच्या वाढीसह 3.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अॅडविक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 162 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.01 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.90 रुपये होती. 29 ऑक्टोबर 2020 रोजी अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 28 पैशावर ट्रेड करत होते. हा नीचांकी किंमत पातळीच्या तुलनेत अॅडविक कॅपिटल स्टॉक 1500 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

अॅडविक कॅपिटल कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने भांडवल उभारण्यासाठी नवीन योजना बनवली आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीने SEBI कडे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड श्रेणी-II च्या परवान्यासाठी अर्ज सादर केला आहे. अॅडविक कॅपिटल कंपनी अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडातून 250 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची तयारी करत आहे.

अॅडविक कॅपिटल ही कंपनी मुख्यतः नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक आणि इतर कॉर्पोरेट भाडेपट्टीवर सल्ला देण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा ग्राहक वर्ग भारतासह जगभरात विस्तारला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Advik Capital Share Price NSE Live 09 January 2024.

हॅशटॅग्स

#Advik Capital Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x