30 April 2024 5:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर मजबूत तेजीत वाढतोय, यापूर्वी 4136% परतावा दिला, खरेदीची योग्य वेळ?

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. आता अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी 750 दशलक्ष डॉलर्स रोख्यांची आठ महिने आधीच परतफेड करण्याची घोषणा केली आहे.

अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरच्या माध्यमातून 750 दशलक्ष डॉलर्स जमा केले होते. हे रोखे या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये परिपक्व होणार आहेत. त्यामुळे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने 9 सप्टेंबर 2024 रोजी परिपक्व होणाऱ्या 750 दशलक्ष डॉलर्स नोट्स पैकी 4.375 दशलक्ष डॉलर्स परतफेड करण्याची घोषणा केली आहे. आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 0.24 टक्के वाढीसह 1,684 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने निवेदन जाहीर करून माहिती दिली आहे की, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने 169 दशलक्ष डॉलर्स राखीव अंतर्गत महसूल खात्यांद्वारे जमा केले आहेत. आणि 300 दशलक्ष डॉलर्स नुकतेच TotalEnergies कंपनीने संयुक्त उपक्रमात गुंतवणूक केली आहे. उर्वरित 281 दशलक्ष डॉलर्स कंपनी प्रवर्तकाला प्रेफरंस स्टॉक वाटप करून उभारणार आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.3 टक्के वाढीसह 1712.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1673.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका महिन्यात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 75 टक्के वाढली आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4,136.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता कंपनीचे शेअर्स 1684 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 439.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची उच्चांक किंमत पातळी 2,185.30 रुपये होती. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,66,323.38 कोटी रुपये आहे.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि जगातील आघाडीची अक्षय ऊर्जा निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी ग्रिड कनेक्ट केलेले सौर पॉवर, पवन आणि संकरित अक्षय ऊर्जा संयंत्रे विकसित करण्याचा व्यवसाय करते. सध्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनी भारतात 12 राज्यांमध्ये एकूण 8.4 GW क्षमतेचे ऊर्जा निर्मिती प्रकल्प चालवत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 09 January 2024.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x